Alka Yagnik | प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकबाबत मोठी बातमी येत आहे. अलका व्हायरल अटॅकची बळी झाली आहे. त्यामुळे त्यांना अचानक ऐकायला येणे बंद झाले आहे. ही बातमी तिने स्वतः तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या बातमीने तिचे सगळे चाहते चिंतेत आहे. परंतु हे कसे झाले या बद्दलची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अलका याज्ञिकने (Alka Yagnik) तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली आहे. पोस्ट करताना, अलका याज्ञिकने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “मी माझ्या सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांना सांगू इच्छिते की व्हायरल हल्ल्यानंतर मला ऐकण्यात अडचण येत आहे. सिंगरने लिहिले की, एके दिवशी मी फ्लाइटमधून बाहेर पडत असताना मला ऐकू येत नव्हते. यासोबतच गायकाने लोकांना मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.”
पुढे ती म्हणाली की, “सगळे मला विचारतात की मी कुठे आहे?” माहिती देताना अलकाने पुढे लिहिले की, “माझ्या डॉक्टरांनी या आजाराचे वर्णन दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हियरिंग लॉस डायग्नोसिस असे केले आहे, जो व्हायरल अटॅकमुळे होतो. या अचानक झालेल्या आजाराने मला खरोखरच आश्चर्यचकित केले आहे आणि मी यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.”
अलकाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते आणि यूजर्स काळजीत पडले आहेत. यावर एका युजरने कमेंट केली की, “हे जाणून खूप वाईट वाटतं, स्वतःची काळजी घ्या.” दुसऱ्या युजरने लिहिले की,: आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्ही लवकर बरे व्हाल.”अशा कमेंट्स करून, चाहते आणि युजर्स ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
अलका याज्ञिक एक अप्रतिम गायिका आहे. लोक तिच्या आवाजाचे खूप वेडे आहेत, फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर देशभरात अलकाचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. तिची गाणी सर्वांनाच खूप आवडतात. आत्तापर्यंत अलकाने २५ हून अधिक भाषांमध्ये २१ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.