Pregnancy Job Scam : महिला गरोदर राहिल्यास तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील ! नक्की काय आहे प्रेग्नन्सी स्कॅम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pregnancy Job Scam : आज सोशल मीडियाच्या जमान्यात जेवढे जग एमेकांशी कनेक्ट झाले आहे तेवढेच या माध्यमातून फसवणुकीच्या घटना देखील घडत आहेत. मात्र या सोशल मीडियावर अनेक फसवणुकीच्या घटनाही समोर येत असतात. फेसबुकवर सध्या एक स्कॅम सुरू आहे. ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’ असे या स्कॅमचे (Pregnancy Job Scam) नाव आहे. या स्कॅम मध्ये देशभरात लोकांचे बळी जात आहेत. नक्की हा स्कॅम आहे तरी काय ? स्कॅमशी संबंधित माहिती जाणून घेऊया…

काय आहे हा प्रेग्नन्सी स्कॅम ?

वास्तविक, फेसबुकवरील एका पेजवर (Pregnancy Job Scam) एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेने म्हटले आहे की ती विवाहित आहे परंतु आरोग्याच्या समस्येमुळे तिच्या पतीसोबत मुले होऊ शकत नाहीत. या महिलेने असेही म्हटले आहे की, जो कोणीही तिला प्रेग्नेंट करू शकेल त्याला ती 10 लाख रुपये देण्यास तयार आहे. व्हिडिओच्या शेवटी, पुरुषाचा आवाज असून गर्भधारणेचे संपूर्ण कार्य आणि एखादी व्यक्ती त्याचा कसा फायदा घेऊ शकते हे सांगतो.

कित्येक लोकांची फसवणूक (Pregnancy Job Scam)

आतापर्यंत अनेक जण या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. याप्रकरणी बिहार पोलिसांनी सुमारे आठ जणांना अटक केली आहे. असे असूनही, या स्कॅम प्रचार करणारी अनेक फेसबुक पेजेस (Pregnancy Job Scam) अजूनही सुरू आहेत. अनेकांना सहज पैसे मिळण्याच्या नादात हजारो रुपये गमवावे लागतात आणि अनेकदा तक्रार नोंदवतानाही लाज वाटते.

तुम्हीही अशा घोटाळ्याचे बळी ठरला असाल तर ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा किंवा नॅशनल सायबर क्राईम (Pregnancy Job Scam) रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊन तक्रार करा.