एका आठवड्यात वजन कमी करायचय? तर गव्हाऐवजी या धान्यांच्या भाकरी खावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी तसेच चरबी कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट विक्रीसाठी आले आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का तुम्ही घरातील व्यवस्थित आहारातूनच वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पौष्टिक आहार आणि गव्हा ऐवजी पुढे देण्यात आलेल्या धान्याच्या भाकरी खाण्याची आवश्यकता आहे. या भाकरी आहारात घेतल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यात स्वतःमधील बदल दिसून येतील .

ओट्सचे पीठ –

ओटचे पीठ हे आरोग्यदायी पिठांपैकी एक आहे. जे तुम्ही गव्हाच्या पिठाच्याऐवजी वापरू शकता. ओट्सचे पीठ शरीरातील फायबर कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ओट्सच्या पिठात कॅलरीज कमी असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या कॅलरीज कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा हा एक उत्तम पर्याय आहे.

राजगिराचे पीठ –

प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले राजगिराचे पीठ गव्हाच्या पिठाला उत्तम पर्याय आहे. या पिठामुळे वजन कमी होते तसेच शरीराचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही जर गव्हाऐवजी दुसरे पीठ वापरण्याचा विचार करत असाल तर राजगिराचे पीठ सर्वोत्तम पर्याय आहे.

नाचनीचे पीठ –

नाचणीचे पीठ हे फायबर आणि अमीनो ऍसिडने भरपूर ग्लुटेन-मुक्त आहे. या पिठामुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते. तसेच या पिठाच्या चपात्या पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.

ज्वारीचे पीठ –

ज्वारीचे पीठ हे ग्लुटेन-मुक्त आहे. जे वजन कमी करण्यास मदत करते. कारण त्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि सी भरपूर प्रमाणात असते. ज्वारीतील पौष्टिकता पचनास मदत करते. तसेच साखर नियंत्रित ठेवल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत करते.