सातारकरांना दिलासा! निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या जिल्ह्यातील सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

निजामुद्दीन येथील “मरकज” या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची (कोविड-19) बाधा झाली आहे.  सातारा  जिल्ह्यातील जे ७ नागरिक मरकज साठी गेले होते. तसेच शासनाकडून मरकजशी निगडीत असलेल्या ५ नागरिकांची नावे आली होती.  त्या सर्वांच्या स्त्रावांचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविले होते.  त्या बारा जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सुचना नुसार त्यांना संस्थात्मक विलगीकरण (क्वॉरंटाईन) मध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन वेळच्यावेळी प्रसार माध्यमांद्वारे वस्तूनिष्ठ माहिती देत आहे.  त्यामुळे जनतेनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनानी ज्या  प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्या काटेकोरपणे पाळाव्यात. या काळात घरात बसून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक देणे हेच सर्वांकडून अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता