Almatti Dam : अलमट्टी धरणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकचा मोठा निर्णय; सांगली-कोल्हापुरवर काय परिणाम होणार?

Almatti Dam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Almatti Dam । पावसाळा आला कि सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण होते.. निमित्त ठरत ते कर्नाटकातील अलमट्टी धरण… कर्नाटकाने अलमट्टी धरणातून विसर्ग गेला कि सांगली- कोल्हापूरचा भाग पाण्याखाली जातो आणि नागरिकांचे मोठे हाल होतात. यंदाही धोक्याची टांगती तलवार डोक्यावर असतानाच महाराष्ट्र आणि कर्नाटकाने मिळून यावर उपायोजना काढण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणजे ऑगस्टच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१७ ते ५१७.५ मीटर दरम्यान राखण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये एक करार झाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काल ऑनलाईन समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीत नेमकं काय ठरलं? Almatti Dam

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील आंतरराज्य समन्वय बैठकीत, आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती, तसेच आंतरराज्य समन्वय या प्रमुख मुद्द्यांवरही चर्चा झाली. दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे ठरवले. आलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, ऑगस्टच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची (Almatti Dam) पाणी पातळी ५१७ ते ५१७.५ मीटर दरम्यान राखली जाईल. ही पातळी धरणाच्या कमाल क्षमतेपेक्षा २ मीटर कमी आहे.

अधिकाऱ्यांनी पूर दरम्यान हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आणि धरणे आणि बॅरेजवरील पाऊस आणि पाण्याच्या पातळीचा रिअल-टाइम डेटा शेअर करण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही राज्यांनी संबंधित धरणांच्या ठिकाणी अधिकारी तैनात करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, कर्नाटकच्या अलमट्टी धरणावर सांगली सिंचन अधिकाऱ्यांना नेमण्यात येईल. महाराष्ट्रातील वारणा आणि कोयना धरणे आणि राजापूर बॅरेजवर कर्नाटकचे अधिकारी तैनात असतील. पूरग्रस्त गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे नियोजन करावे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बरगे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे, नदीपात्रामध्ये पूल, बंधारे किंवा इतर बांधकामासाठी पाणी अडविण्यासाठी घालण्यात आलेले बांध काढून टाकणे या गोष्टींवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे बोललं जातंय.