Almond Facepack | ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात. अगदी मेंदूपासून ते स्किनपर्यंत ड्रायफ्रूट्स आपल्याला मदत करतात. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम हा अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. बदाम (Almond Facepack) आपल्या आरोग्यासाठी जेवढा फायदेशीर आहे. तेवढा आपल्या त्वचेलाही अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन ई प्रमाणात असतात ज्यामुळे आपली त्वचा अत्यंत मुलायम होते. आणि चमकते. त्याचबरोबर आपल्या त्वचेचा रंग देखील सुधारतो. परंतु या बदामाचा आपल्या चेहऱ्यावर नेमका कसा वापर करावा? या गोष्टीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेला चमक येईल.
जर तुमच्या देखील चेहऱ्यावर पिंपल्स असतील पिंपल्सचे डाग, त्याचप्रमाणे त्वचेचा पोत यांसारख्या समस्या असतील, तर तुम्ही बदाम आणि दुधाचा वापर करू शकता. यामुळे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स कमी होतात. आता या बदामाचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊया.
बदामाचा फेस पॅक | Almond Facepack
तुम्ही बदामाचा फेस पॅक तयार करून देखील चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी फेसपॅक बनवायला लागेल. नंतर तुम्ही एक छोटी वाटी बदाम घ्या त्यात पाणी घालून रात्रभर ते भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची साल काढून किंवा सालीसकट तुम्ही मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट करून घ्या. पेस्ट करून झाल्यावर त्यात थोडंसं दूध घाला. अशाप्रकारे तुमचा बदामाचा फेस पॅक रेडी होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ घेऊन धुऊन घ्या. आणि बदामाची ती पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. अर्धा तास ती पेस्ट तशीच ठेवा. नंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यात काही वेळानंतर तुम्ही बदामाच्या तेलाने देखील चेहऱ्याची मालिश करू शकता.
बदामाच्या फेस पॅकचे फायदे
- तुमची त्वचा जर अत्यंत कोरडी आणि निर्जीव झाली असेल, तर तुम्ही हा फेसपॅकचा वापर नक्की करा. यामुळे तुमची त्वचा अत्यंत मुलायम अशी होते.
- त्याचप्रमाणे तुम्हाला जर डार्क सर्कल असतील, त्याचप्रमाणे चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग असतील तर हा फेस पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग धब्बे तर दूर होतातच, तसेच तुमची त्वचा देखील चमकदार आणि एकदम सुंदर दिसते.