सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहराच्या दिशेने निघालेली चारचाकी कार यवतेश्वर घाटात दरीत कोसळलेली आहे. या आपघातातील गाडी 700 फुट दरीत फेकली गेली असून गाडीचा चक्काचूर आहे. सुदैवाने यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून अन्य 5 जणही जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी 3. 30 वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटातून सातारा शहराच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना चारचाकी वाहन महादरे तळेच्या दिशेला 700 फुट दरीत कोसळली. या वाहनात 7 प्रवासी असल्याची माहिती समोर आली असून त्यातील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यवतेश्वर घाटात अल्टो कार 700 फूट दरीत कोसळली : सात युवक जखमी@HelloMaharashtr @AurangabadHello pic.twitter.com/ZpYSN9NEFJ
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) August 13, 2022
या मदत कार्यात स्थानिक नागरीक, वाहन चालक, पोलीस, ट्रेकर्स यांनी मदत कार्य राबवून जखमीना उपचारासाठी रूग्णांलयात दाखल केल्याची माहीती समोर आली आहे. अपघातात अल्टो कार कोसळली असून सर्व जखमी हे युवक आहेत. पोलिसांनी तात्काळ ट्रेकर्सला बोलावून जखमी युवकांना बाहेर काढले.