Wednesday, February 8, 2023

भारतात सर्वाधिक अपमान हा मुस्लिमांचा केला जातो : असुद्दीन ओवेसी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथील जलसा कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे. “भारतात जर कोणाचा सर्वात जास्त अपमान झाला असेल तर तो मुस्लिम झाला आहे. भारतात असुरक्षित मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेंनी केली, मुस्लिमाने केलेली नाही,” असे ओवेसी यांनी म्हंटले आहे.

हैदराबाद येथील कार्यक्रमात अध्यक्ष ओवेसी यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारताच्या विभाजनाला मुस्लिम जबाबदार नाहीत. इतिहासात मुस्लिमांचे योगदान कोणाहीपेक्षा कमी नाही, आपल्याला स्वातंत्र्याचा उत्सव एकत्र साजरा करायचा आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र आजही गरिबीतून मुक्तता होऊ शकलेली नाही. आजही देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे. देशात गोरक्षकांना जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते देऊ नये. आम्हाला आशा आहे की पंतप्रधान आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात देशातील जनतेचा उल्लेख करतील.

- Advertisement -

एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना दुसरीकडे मुस्लिमांनी लढलेला देशाच्या स्वातंत्र्याचा लढा संपला पाहिजे, अशी फॅसिस्ट आणि जातीयवादी शक्तींची इच्छा आहे. या शक्ती इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून एकतर मुस्लिमांची स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका पुसली जाऊ शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, असे ओवेसी यांनी म्हंटले.