हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा सुरू झालेला आहे. आणि या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात त्वचा कोरडे पडते. तसेच पिंपल्स येण्याचे प्रकार देखील हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात. यासाठी अनेक लोक केमिकल ट्रीटमेंट घेतात. परंतु जर तुम्ही घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केले, तर यामुळे तुमच्या त्वचेला देखील कोणती हानी देखील पोहोचणार नाही. आज आपण तुरटीचा वापर करून चेहऱ्यावरील डाग पिंपल्स कसे घालवायचे? हे जाणून घेणार आहोत. तुरटी ही आपल्या चेहऱ्यावर जर योग्य पद्धतीने लावली, तर आपले सौंदर्य आणखी खुलते. तुरटीमुळे पिगमेंटेशन, पिंपल्स डार्क स्पॉट सारख्या गोष्टी कमी होण्यासाठी मदत होतात. असे सौंदर्यतज्ञांचे देखील मत आहे.
तुरटीचा वापर कसा करावा?
त्वचेवरील पिंपल्स पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी तुरटीचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. यासाठी तुम्ही एक टीस्पून एवढी तुरटी घ्या, आणि त्यामध्ये त्याच्या दुप्पट हळद टाका. त्यानंतर या मिश्रणात गुलाब पाणी घालून टाकून ते एकत्र मिक्स करा. आणि तो तुमच्या चेहऱ्यावर लावा. आणि पाच ते सात मिनिटांनी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. तुमच्या चेहऱ्याला फेसवॉश किंवा साबण लावू नका. तुम्ही आठवड्याततून एकदा किंवा दोनदा हे केले, तर तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला फायदा दिसून येईल.
त्वचा टाईप करण्यासाठी तुरटी उपयुक्त असते. यासाठी तुम्ही अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये तुरटी पावडर टाका. ती तुरटी पूर्ण विरघळेपर्यंत हलवा. त्यानंतर पाणी जेव्हा थंड होईल तेव्हा एक दोन चमचे गुलाब पाणी आणि आठ ते दहा थेंब ग्लिसरीन टाकू ते व्यवस्थित हलवून टेबल एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर मारा तुम्ही जर आठवड्यातून असे दोन ते तीन वेळा केले, तर तुमची लूज झालेली त्वचा टाईट होण्यासाठी तसेच सुरकुत्या कमी होण्यासाठी याचा उपयोग होईल. अशाप्रकारे तुम्ही तुरटीचा वापर करून तुमचा चेहरा आणखी सुंदर बनवू शकता.




