लाईफस्टाइल |मुलाखत ही मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याला सामोरे जाताना अनेकांना भीती वाटते आत्मविश्वास दुरावल्यासारखं होतं. व्यावसायिक जीवनात प्रत्येकाला मुलाखतीचा सामना हा करावा लागतो. परंतु याचा सामना करत असताना अपयशी होण्याची भीती निर्माण न होण्यासाठी काही क्लृप्त्या वापरलात तर तुमची मुलाखत यशस्वी होण्यास नक्की मदत होईल.
१) मुलाखतीला जाताना ड्रेस हा फॉर्मल हवा. कारण मुलाखतीला फॉर्मल घालून जाणं सभ्यतेचं लक्षण मानलं जातं.
२) आतमध्ये गेल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीशी नजर चुकवू नका. त्याला सामोरं जा.
३) येत असणाऱ्या प्रत्येक प्रश्नचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
४) येत नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येत नाही असं म्हणून प्रामाणिकपणा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.
५) आत गेल्यावर हातवारे करून बोलणं टाळा.
६) कोणतंही दडपण न घेता सामोरे जा. आयुष्यात अनेक वेळा मुलाखती दिल्यात असा आव आणू नका.
७) मोबाईल असेल तर तो बंद करून ठेवणं सभ्यपणाचं लक्षण मानलं जातं.
८) मुलाखतीला जाण्यापूर्वी यशस्वी आणि अपयशी व्यक्तींच्या पुस्तकांचं वाचन करण्यावर देखील भर द्या.
९) मुलाखतीला जाण्यापूर्वी काही काळ पुरेशी झोप घ्या. वेळेला महत्व द्या. मुलाखतीला जाताना वेळ पाळा.
१०) वाचन, मनन,चिंतन या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी प्रमाण मानून जगातल्या घडामोडींची काही प्रमाणात माहिती ठेवा जी तुमच्या या मुलाखती बरोबरच तुमच्या ज्ञानात भर पाडेल आणि जगातल्या सर्व संकटांना तुम्ही सामोरे जाल.