केंद्रीय पथकाने फक्त ६ तासात आटोपला सोयाबीन पीक नुकसान पाहणी दौरा; शेतकरी संतप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । विदर्भातील बऱ्याच भागात खोड कीडीमुळे आणि इतर अनेक रोगामुळे लाखो हेक्टर वरील सोयाबीन खराब झाले आहे. याचा फटका अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ३ दिवसांपूर्वी खास दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यात आलेले होते. मात्र, या केंद्रीय पथकाने केवळ ६ तासांतच ६ तालुक्यातील शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून दौरा आटोपता घेतल्याने आता या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

६ तासात ६ गावात केलेल्या नुकसान पाहणीतून काय साध्य होणार असा सवालही उपस्थित झाला आहे. केंद्रीय पथकाच्या या दौऱ्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही आता टीका केली आहे. या वर्षी बोगस बियाण्याने शेतकरी संकटात सापडले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले. त्यात दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसे बसे सोयाबीन पीक उभे केले परंतू वातावरणातील बदला मूळे खोडकिडीच्या रोगाने आक्रमक केल्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दोन अधिकाऱ्यांच एक केंद्रीय पथक ३ दिवसांपूर्वी अमरावती मध्ये येऊन गेलं आहे. या पथकाने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ९ गावामध्ये जाउन गावानजीकच्या शेतात सोयाबीन नुकसानीची पाहणी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment