Saturday, March 25, 2023

अमरावतीला आला शिमला,कुलू-मनालीचा फील; पावसाच्या हलक्या सरींसोबत पडलं दाट धुकं

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर परतवाडा सह आजबाजूच्या गावांमध्ये शुक्रवारी रात्री अचानकपणे पाऊस आल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे काही शेती पिकांनासुद्धा याचा फटका बसल्याचं समजून आलं. कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे उघड्यावर असलेल्या काही धान्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलेला असल्याचं नागरिकांच्या सकाळीच लक्षात आलं.

- Advertisement -

रात्री अचानक आलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी संपूर्ण परिसरामध्ये धुक्याने दाट चादर ओढली होती. धुक्याचं वातावरण असल्याने सकाळी काही वेळासाठी लोकांना स्पष्ट दिसण्यात अडचण येत होती. अनेकांनी आपल्या वाहनांचे हेडलाईट सुद्धा लावले होते. आधी हिवाळ्याचे दिवस, त्यात आलेला अवकाळी पाऊस आणि नंतर धुक्यांनी ओढलेली चादर हे एकूणच वातावरण शिमला- कुल्लूमनाली सारखे दिसत होते.