Amazon वर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप, कंपनीने म्हटले – “भ्रष्टाचाराविरोधात दुर्लक्ष नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी Amazon च्या वकिलांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. भारतीय अधिकाऱ्यांना कथितरीत्या लाच दिल्याच्या आरोपादरम्यान Amazon चे हे स्टेटमेंट आले आहे. यामध्ये कंपनीने स्पष्ट केले की,” ते लाचखोरीचे आरोप गंभीरपणे घेत आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करेल.”

‘द मॉर्निंग कॉन्टेक्स्ट’ या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, Amazon ही बाब गंभीरपणे घेत आहे. या वेबसाईटने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की,” कंपनीने या प्रकरणी आपल्या वरिष्ठ कायदेशीर प्रतिनिधी राहुल सुंदरमला रजेवर पाठवले आहे.”

कंपनीने काय म्हंटले ते जाणून घ्या
वृत्तसंस्थेने या प्रकरणाबाबत सुंदरमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याने स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. त्याच वेळी, कंपनीच्या प्रवक्त्याच्या मते, Amazon भ्रष्टाचार अजिबात सहन करू शकत नाही, म्हणूनच हे आरोप गंभीरपणे घेतले गेले आहेत. Amazon च्या व्हिसलब्लोअरने भारतीय वकिलांनी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला. यानंतर हे प्रकरण समोर आले.”

CAIT ने केली सीबीआय चौकशीची मागणी
फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यावसायिक संघटनेने या प्रकरणाबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. CAIT ने या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे उघड करावीत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी CAIT ने केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, असे संघटनेने म्हटले आहे.

CAIT चे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की,”सीबीआयच्या तपासात त्या अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नावे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यांनी भ्रष्टाचार संपवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जे या लाचखोरी घोटाळ्यात सामील आहेत त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून इतर अधिकारी असे करण्याचे धाडस करू शकणार नाहीत.”

Leave a Comment