हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Alexa Prime Offer : Amazon च्या Alexa ला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने Amazon India कडून एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जाणार आहेत. याबाबत माहिती देताना Amazon India ने सांगितले की,” या सेल दरम्यान, ई-रिटेलर Amazon Echo स्मार्ट स्पीकर आणि स्मार्ट डिस्प्लेच्या खरेदीवर ग्राहकांना 60% पर्यंतची सूट दिली जाणार आहे.
याशिवाय, कंपनीकडून फायर टीव्ही उपकरणांच्या खरेदीवरही 50% पर्यंत सूट दिली जाईल. इतकेच नाही तर कंपनीने बंडल ऑफर्सवर 60% पर्यंतची सूट देण्याबाबतही सांगितले आहे. याशिवाय Amazon India ने सांगितले की,” या दोन दिवसांच्या सेलमध्ये अलेक्सा बिल्ट-इन असलेल्या डिव्हाइसेसवरही 40% पर्यंतची सूट दिली जाईल.” Amazon Alexa Prime Offer
ब्रँडेड स्मार्ट वॉचवर मिळणार अर्ध्याहून जास्तीची सूट
या लिस्टमध्ये boAt, Noise आणि Fastrack सारख्या कंपन्यांच्या डिव्हाइसेसचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अलेक्सा बिल्ट-इन असलेल्या boAt स्मार्टवॉचवर 60% पर्यंत सूट मिळेल. याव्यतिरिक्त, Amazon India ने सांगितले की,”Amazon Echo स्मार्ट स्पीकर आणि फायर टीव्ही स्टिक एकत्र खरेदी करून ग्राहकांना 500 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.” Amazon Alexa Prime Offer
Amazon India कडून 5th Generation Echo Show 5 स्मार्ट डिस्प्लेच्या खरेदीवर फ्लॅट 38% सूट दिली जात आहे. त्याची किंमत 8,999 रुपये आहे. मात्र, या सेलमध्ये ते 5,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, 4,499 रुपये किंमतीचा Amazon Echo Dot (3rd Gen) 45 टक्क्यांच्या सवलतीनंतर 2,449 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
Alexa Echo वर मिळेल फ्लॅट 50 टक्क्यांपर्यंतची सूट
Amazon India कडून वायर्ड चार्जिंग केसवाल्या Alexa सह Echo Buds वर फ्लॅट 50 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. त्याची किंमत 11,999 रुपये आहे. मात्र, या सेलमध्ये ते 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे Amazon Echo Dot (3rd Gen) ट्विन-पॅक आणि स्मार्ट बल्ब कॉम्बोवर 60% पर्यंतची सूट देखील मिळत आहे.
फायर टीव्ही बाबत बोलायचे झाल्यास, Amazon India Fire TV Stick 4K Max च्या खरेदीवर 35 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. ज्याची किंमत 6,499 रुपये आहे. मात्र, या सेलमध्ये ते 4,199 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Amazon Alexa Prime Offer
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/b?ie=UTF8&node=26249282031
हे पण वाचा :
Bank FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! सरकारी बँका देत आहेत मजबूत रिटर्न
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे नवीन भाव
adhaar Card Pan Card Link : आयकर विभागाने जारी केली महत्वाची सूचना, 31 मार्चपर्यंत लिंक करा अन्यथा…