औरंगाबाद । शिवसेनेच्यावतीने राज्यात प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मातोश्रीवरुन निघाले आदेश
जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे यांनी गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचे संघटन वाढवल्याचे पाहायला मिळाले. शिस्तबद्ध नियोजन, पक्षाच्या ध्येय धोरणानूसार आंदोलनांची आखणी, दिल्ली ते गल्ली अशा सगळ्या विषयांवर त्यांनी परखड भूमिका घेतली आहे.
लोकसभा ते ग्रामपंचायत अशा सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये दानवे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या कामाची छाप गेल्या अनेक वर्षात पाडल्याचे पहायला मिळाले. राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आणि दानवे यांच्या कामाची थेट शिवसेना पक्षप्रमुखांकडूनच वेळोवेळी दखल घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou