मुकेश अंबानींच्या नातवाचं झालं बारसे; ठेवलं ‘हे’ नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या नातवाचं नामकरण करण्यात आलं आहे. आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांनी आपल्या बाळाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. अंबानी कुटुंबाच्या नव्या वारसदाराचं पृथ्वी (Prithvi) असं नाव ठेवण्यात आलं आहे. 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात बाळाचं आगमन झालं.

‘भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि आशीर्वादांमुळे श्लोका आणि आकाश अंबानी यांच्या मुंबईतील घरी मुलाने जन्म घेतला’ अशी घोषणा अंबानी कुटुंबाने केली होती. अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्यामुळे मुलाचे नाव पृथ्वी ठेवल्याचे बोलले जाते.

पणजीकडून नावाची घोषणा
‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने धीरुभाई अंबानी यांच्या आशीर्वादांनी कोकिलाबेन अंबानी यांना पृथ्वी आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे. बाळाचे आई-बाबा श्लोका आणि आकाशही आनंदी आहेत. बाळाच्या नावाची घोषणा करताना आजी-आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी तसेच मोना आणि रसेल मेहता अत्यंत खुश आहेत’ असं अंबानी कुटुंबातर्फे बाळाचं नाव जाहीर करताना लिहिण्यात आलं आहे.

मुकेश अंबानींसोबतचा फोटो हिट
गोंडस नातवाला हातात धरला असतानाचा मुकेश अंबानींचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्युनिअर अंबानीच्या आगमनानंतर त्यांच्या अँटिलिया निवासस्थानी निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’