औरंगाबाद । शहरातील शहागंज पैठणगेट परिसरात गेल्या २-३ दिवसांपासून निर्बंध असताना देखील सतत गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य खरेदी विक्रीचे हे ठिकाण मानले जाते. शहरात कोरोना मुळे कडक निर्बंध लावलेले असतानाहि गर्दी होत असल्याचे दिसत आहे. या गर्दीमुळे बऱ्याच वेळा वाहतूककोंडी सुद्धा निर्माण होते.
आज सकाळी शहरातील शहागंज भागात अशीच गर्दी आणि वाहतूककोंडी पाहायला मिळाली. यावेळी एक रुग्णवाहिका त्या गर्दीमध्ये अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या गर्दीमुळे त्या रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण झाला. बराच वेळ हॉर्न वाजवून रुग्णवाहिका चालकाने गर्दीतुन रस्ता काढण्याचा प्रयत केला.मात्र नागरिकांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रास्ता मोकळा करुन दिला नाही.
या सर्व प्रकारचा तेथील एका नागरिकाने व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर प्रसारित केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. रुग्णाला वाचवण्यासाठी वेळेच फार महत्त्व असत तरीही नागरिकांचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. यावर रुग्णांचा जीव महत्वाचा कि हि नागरिकांची गर्दी असा प्रश्न उभा राहतो. आणि संचारबंदी दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर गर्दी करत असतील तर प्रशासनाचे या गोष्टीवर दुर्लक्ष का असाही प्रश्न निर्माण होतो.