मुंबई प्रतिनिधी | आरोग्य कर्मचाऱ्यांना विम्याचं संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र या कर्मचार्यांसोबत रुग्णवाहिका चालकांनाही विम्याचे संरक्षण देण्याचा विचार सरकारने करावा असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना पेशंटच्या संपर्कात येणारे पोलीस व अन्य विभागांतील कर्मचार्यांनाही सरकारने विम्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे असं पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने सदर कर्मचार्यांना विमा देण्याचा विचार करावा अशी विनंती पवार यांनी ट्विट करुन केली आहे.
रुग्णवाहिका चालक आणि कोरोना पेशंटच्या संपर्कात येणाऱ्यांनाही विम्याचं संरक्षण देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती.. https://t.co/N2XPChXgAp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 30, 2020
दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१५ वर पोहोचली आहे. वैद्यकिय क्षेत्रातील सेवक आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांना शासनाने विम्याचे संरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यामध्ये रुग्णवाहिका चालकांचाही समावेश करणे गरजेचे असल्याचे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
…तर देशातील ‘हे’ राज्य होणार ७ एप्रिल पर्यंत कोरोनामुक्त
WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन