नवी दिल्ली । अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असा दावा केला की,”जेव्हा चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढतो तेव्हा माकडांना (Monkeys) गुदमरल्यासारखे वाटते. जेव्हा बक्षिस जिंकण्याचा प्रश्न येतो तेव्हा दबाव आणखी वाढतो.”
माकड देखील माणसांप्रमाणेच दबावाखाली येतात. जेव्हा बक्षिस जिंकण्याचा प्रश्न येतो, तेव्हा माकडांनी माणसांप्रमाणेच त्यांच्या कामगिरीत आपला जीव ओतला. अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी माकडांवर संशोधन केले. चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढल्यावर माकडांना गुदमरल्यासारखे वाटते, असे संशोधनातून समोर आले आहे. जेव्हा बक्षिसे जिंकण्याचा प्रश्न येतो तेव्हा दबाव आणखी वाढतो. माकडं किती ताणतणावांना सामोरे जातात हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केले. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शास्त्रज्ञांनी 3 रीसस माकडांना प्रशिक्षण दिले. परिणामी, जसे बक्षीस वाढते तशी माकडांची कामगिरी देखील वाढते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा जॅकपॉट म्हणजेच सर्वात मोठे बक्षीस माकडांसमोर ठेवण्यात आले तेव्हा 25 टक्के माकडे अयशस्वी झाली. कारण माकडांवर जॅकपॉट जिंकण्यासाठी अधिक दबाव आला. या संशोधनानुसार, प्रेक्षकांसमोर काम करताना माणसं ज्या प्रकारे दबावाखाली येतात, माकडांच्या बाबतीतही तसेच घडते.
या संशोधनादरम्यान 3 माकडांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान, त्यांना समजावून सांगण्यात आले की, बक्षीस किती मोठे आहे. यासह, त्यांना लहान, मध्यम, मोठे जॅकपॉट बक्षीस मिळवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान बक्षीसाचा आकार हळूहळू वाढवण्यात आला. यावेळी शास्त्रज्ञांना असे आढळले की, जसे जसे बक्षीस वाढते, त्यांची कार्यक्षमता देखील वाढते. पण जेव्हा सर्वात मोठे बक्षीस आले तेव्हा ते अधिक तणावग्रस्त झाले. मोठी बक्षिसे मिळवण्यासाठी, ते इतक्या दबावाखाली आले की, त्यांची कामगिरी 10 ते 25 टक्क्यांनी कमी झाली. जॅकपॉट बक्षीसाचा आकार मध्यम आकाराच्या बक्षीसापेक्षा 10 पट मोठा होता.
पिट्सबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, माणसे आणि माकडं हे वर्तनाच्या बाबतीत काहीसे समान आहेत. या संशोधनातही हे सिद्ध झाले आहे. या संशोधनादरम्यान असेही पुरावे मिळाले आहेत की माकडं स्वतःच्या वर्तनावर लक्ष ठेवतात. ते किती आनंदी आहेत आणि किती चिंताग्रस्त आहेत हे त्यांना चांगले समजते.