नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेले युद्धाचे संकट अजून संपलेही नव्हते की, तोच आता आणखी एक नवीन संकट समोर येऊन ठाकले आहे. गुरुवारी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, जर स्वीडन आणि फिनलंडने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना NATO मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर रशियाला या प्रदेशात अण्वस्त्रे तैनात करून आपल्या भूभागाचे संरक्षण करावे लागेल.
युक्रेनच्या NATO मध्ये सामील होण्याच्या मुद्द्यावरून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले. तसेच आता फिनलंड आणि स्वीडननेही असा निर्णय घेतल्यास भविष्यात असे युद्ध पुन्हा पाहायला मिळू शकते. फिनलंड रशियाशी 1300 किमी लांबीची सीमा शेअर करतो आहे. NATO मध्ये सामील व्हायचे की नाही याचा निर्णय येत्या काही आठवड्यांत फिनलंडकडून घेतला जाईल, असे फिनलंडच्या पंतप्रधान सना मारिन यांनी बुधवारी सांगितले.
दरम्यान, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव म्हणाले की,” स्वीडन आणि फिनलंड NATO मध्ये सामील झाल्यास रशिया आपले जमीन, नौदल आणि हवाई दल मजबूत करण्याबाबत निर्णय घेईल. फिनलंड आणि स्वीडनमधून असे सिग्नल्स आल्यानंतर रशियाने त्यांना इशारा दिला आहे.
आता फिनलंडला आपल्या निर्णयाबद्दल विचार करावा लागेल. यामुळे युक्रेनसारखीच आपली अवस्था तर होणार नाही ना, अशी भीती फिनलंडला वाटते आहे. त्यामुळे आता आपला देश NATO चा पोर्टर असल्याचं फिनलंडच्या पंतप्रधानांकडून सांगण्यात आलं आहे, मात्र त्याचा सदस्य बनणं हा एक वेगळा मुद्दा आहे आणि येत्या काळात आम्ही त्याचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करू.
फिनलंड NATO चा सदस्य झाल्यास युरोपमधील सुरक्षा स्थिती कोणत्याही प्रकारे सुधारता येणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. त्याने फिनलंडला इशारा दिला की, त्याच्या निर्णयामुळे विनाश होईल. जूनच्या अखेरीस फिन NATO मध्ये सामील होण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो, असे मानले जात आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला, फिनलंड आणि स्वीडनने शेजारील रशियाच्या इशाऱ्या कडे दुर्लक्ष केले आहे की दोन्ही देशांना NATO मध्ये सामील झाल्यास “गंभीर लष्करी आणि राजकीय परिणाम” भोगावे लागतील. फिनलंडचे परराष्ट्र मंत्री पेक्का हॅविस्टो यांनी शनिवारी फिनिश राज्य प्रसारक YLE ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले: “आम्ही ते आधीच ऐकले आहे. हा लष्करी कारवाईचा इशारा आहे यावर आमचा विश्वास नाही.”