तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी – आमीर खान

0
38
Amir Khan on Nana Patekar and Tanushree Datta conflict
Amir Khan on Nana Patekar and Tanushree Datta conflict
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान ‘मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती’ असेही तनुश्रीने म्हटले आहे. तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी असं मत अभिनेता अमिर खान याने मांडले आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अमिर बोलत होता.

इतर महत्वाचे –

साइना नेहवाल करणार या खेळाडू सोबत लग्न

ट्रायल रुममधे विदेशी तरुणीसोबत अश्लील चाळे

तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरु आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते. तसेच नाना पाटेकरांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तनुश्री ने केला आहे. ‘पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती’ असे गंभीर आरोप तनुश्री दत्ता ने एका मुलाखतीत केले होते.

इतर महत्वाचे –

झांशी की राणी फेम उल्का गुप्ता सध्या काय करते?

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

या प्रकाराबाबत ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या ट्रेलर लाँच प्रसंगी माध्यमांनी अमीरला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला पूर्ण माहिती नसेल, तर त्यावर बोलणं कठीण आहे. जर असं झालं असेल, तर ते चुकीचं आहे. मी यावर अधिक बोलू शकत नाही. या गोष्टीची चौकशी व्हायला हवी”. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी या प्रकरणावर न बोलणेच पसंद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here