अभिनंदन झेंडे हल्लाप्रकरणी अमिर शेख पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिनंदन झेडेंवरील हल्लाप्रकरणी शेख टोळीतील अमिर शेखला कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. शेख याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून लवकरच त्याची अमलबजावणी होईल. असे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेकॉर्डवरील गुन्हेगार  अभिनंदन झेंडे याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली होती. सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने हल्लेखोरांकडील कोयता, चाकू, दांडकी हस्तगत केली होती. या प्रकरणात जे बाबा टोळीच्या अमिर शेख याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले.

 पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या पथकाने शेख याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव म्हणाले जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे सुरू आहे. शेख टोळीवर यापुर्वी खून, मारामारीसह इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.