लातूर प्रतिनिधी | काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा नेहमीच आरोप केला जातो. त्याचाच प्रयत्य येत्या निवडणुकीला येणार आहे. कारण लातूर शहराचे आमदार अमित देशमुख हार्टिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर त्यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून आमदार त्र्यंबक भिसे यांचे तिकीट कापून विधानसभा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे देशमुख बंधूंच्या रूपाने काँग्रेसची घराणेशाही पुन्हा डोकेवर काढणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागील काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येथील उमेदवार जाहीर करून टाकले. त्यावेळी राष्ट्रवादीने दिलेले सर्वच उमेदवार हे घराणेशाहीचे प्रतिनिधी होते त्यामुळे त्यांच्यावर खूपच टीका केली गेली. त्याच घराणेशाहीचा प्रत्येय शेजारील लातूर जिल्ह्यात येणार आहे. कारण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन सुपुत्र निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसकडून उतरवले जाणार आहेत.
अमित देशमुख यांनी लातूर शहर मधून याआधी दोन वेळा निवडणूक लढवली आहे. २००९ आणि २०१४ च्या दोन्ही विधानसभा निडणुकीत त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय संपादित केला आहे. तर यावेळी ते हार्टिक करणार अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. तर २०१७ साली जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी जिल्हापरिषद निवडणूक लढलेले धीरज देशमुख जिल्हा परिषद सदस्य तर झाले मात्र जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. मात्र लातूर ग्रामीण मतदारसंघात निवडणूक लढून जिंकायचीच असा चंगच आता धीरज देशमुख यांनी बांधला आहे. परंतु हळूहळू काँग्रेसची पकड ढिल्ली होऊन भाजपची पकड मजबूत होत गेलेल्या लातूर जिल्ह्यात देशमुख बंधूंना विधानसभेची निवडणूक सोपी नसणार हे मात्र नक्कीच.