‘नेहरू यांनी स्थापन केलेल्या ‘एम्स’ रुग्णालयात अमित शाह लवकर बरे व्हावे, हि प्रार्थना’ – सत्यजित तांबे 

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी | भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना ‘स्वाइन फ्लू’ ची लागण झाल्याने ते सध्या दिल्लीतील ‘एम्स’ मध्ये उपचार घेत आहेत . ते लवकर बरे व्हावे म्हणून देशभरातून अनेक नेते व त्यांचे हितचिंतक प्रार्थना करीत आहेत. या मध्ये महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे  यांनी ते लवकर बरे व्हावेत व त्यांना उत्तम आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना केली आहे. मात्र, त्यांनी प्रार्थनेच्या संदेशात ‘एम्स’ संस्था कोणी स्थापन केली आहे याची आठवण भाजपवासीयांना करून दिली आहे. 

 “१९५६ मध्ये पंडित नेहरू यांनी स्थापन केलेल्या ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांचा उपचार सुरु आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो.” असे तांबे यांनी त्यांच्या संदेशात म्हंटले आहे. भाजपा वरचेवर कोन्ग्रेसने मागील साठ वर्षांत काय केले? असा सवाल उपस्थित करत असते. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी केलेल्या ट्वीट ची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

भारतीय जनता पक्षाकडून नेहमी गांधी- नेहरू घराण्यावर  आरोप केले जातात. काँग्रेसने ६० वर्षांपासुन देशाचा शून्य विकास केला असल्याचे अनेक नेते नेहमी त्यांच्या प्रचारात बोलत असतात, या टीकेवर तांबे यांनी हि मार्मिक टीका केली आहे.  आज त्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पं.नेहरूंनी त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या एम्स  नामक संस्थेत उपचार घ्यावे लागत आहेत. 


ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

म्हणून मी पेरु समाधीवर ठेवला आणि दर्शन घेतले – पंकजा मुंडे

भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन

इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी