१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

तसेच महाराष्ट्राला नंबर वन बनवायचे असेल तर महायुतीला साथ देण्याचा आवाहन त्यांनी मतदारांना केले. स्थानिक मुद्द्यांना हात घालताना त्यांनी कोल्हापूर आणि सांगली मध्ये महापुराने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मोठी मदत केंद्र सरकारकडून लवकरच करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोल्हापुरात काल झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत त्यांनी या सर्व घोषणा केल्या आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ‘कोल्हापुरी चप्पल’ला जी-आय मानांकन देऊन सन्मान मिळवून दिला. तसेच लवकरच कोल्हापूरला आयटी पार्क देऊ ‘ अशी घोषणाही शहा यांनी या सभेत केली. दरम्यान ‘कोल्हापूरात २०१४ मध्ये महायुतीचा प्रचार शुभारंभ केल्यानंतर मोठे यश प्राप्त झालं होते. आत्ता कोल्हापुरात येऊन ‘अंबाबाई’चे आशीर्वाद घेत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने ‘महायुती’चा विजय पक्का असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment