विशेष प्रतिनिधी । विधानसभा निकालात सर्वात जास्त जागा मिळवत भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेचा तिढा अजून कायम आहे. सध्या शिवसेना ५६ तर भाजप १०५ जागा मर्यादित राहिली आहे. मात्र राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेना नेमके कोणासोबत सरकार स्थापन करणार हा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोन जरी शुभेच्छा देण्यापुरता नसून सत्तास्थापनेच्या व्यवहारासाठी झालेला आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान अमित शाहांनी शिवसेनेचे निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले आहे त्याबद्दलही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच दिवाळीनंतर दोन्ही नेत्यांची नव्या सरकार स्थापनेपूर्वी बैठकीही आयोजित केली आहे. या बैठकीत कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक नक्की कधी, किती वाजता आयोजित केली आहे. याबाबत अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजपा-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र दिसत आहे.