एकनाथ शिंदे- शहांमध्ये 4 तास खलबतं; मंत्रिपदांचा फॉर्म्युला ठरला??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या भेटीत तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. राज्यातील मंत्रिमंडळ आणि खातेवाटप याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.

अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री 2 वाजेपर्यंत विविध राजकीय गोष्टीवर चर्चा झाली. तसेच यावेळी कायदेतज्ज्ञही उपस्थित होते. 11 जुलै ला कोर्टात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर देखील शिंदे- शहांमध्ये खलबते झाल्याची शक्यता आहे. तसेच एकूण खाते वाटप, कोणाला किती मंत्रीपदे याबाबत सविस्तर चर्चा झाली असेल.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 13 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाऊ शकते. तसेच परफॉर्मन्स नुसार मंत्रीपदे देण्यात येतील असेही यापूर्वी भाजपकडून सांगण्यात आले होते.

Leave a Comment