हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूड सिने विश्वातील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी शुक्रवारी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली होती. अचानक प्रकृती खालावल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे अनेक वृत्तांमधून समोर आले. मात्र, आता अमिताभ बच्चन यांनी आपल्या तब्येतीबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
कालपासून अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच अँजिओप्लास्टीच्या वृत्तानंतर अमिताभ बच्चन हे शुक्रवारी संध्याकाळी इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याला हजर राहिले होते. (Amitabh Bachchan) या सामन्यातील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर करत आयएसपीएल फायनलच्या संध्याकाळचा अनुभव अत्यंत चांगला होता, असे म्हटले आहे. तसेच सचिन बरोबर वेळ घालवला आणि क्रिकेटबद्दल त्याच्याकडून बरंच काही जाणून घेता आलं, अशा आशयाची त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून सगळ्यांनाच धक्का लागला.
फेक न्यूज- Amitabh Bachchan
आयएसपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर अमिताभ बच्चन जेव्हा स्टेडियममधून बाहेर पडले तेव्हा अनेक माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याभोवती घोळका केला. दरम्यान अनेक प्रतिनिधींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अमिताभ यांनी आपल्या प्रकृतीबद्दल बोलताना कालपासून व्हायरल होणाऱ्या बातम्यांना ‘फेक न्यूज’ असे म्हटले आहे. (Amitabh Bachchan) याचा अर्थ असा की, महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीला काहीही झाले नसून ते एकदम ठणठणीत आहेत. मग त्यांच्या तब्येतीबाबत या अफवा उठवल्या कोणी? असा सवाल उपस्थित होत आहे.
शुक्रवारी ८१ वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया X हँडलवरील ‘सदैव कृतज्ञ’ ही पोस्ट व्हायरल होत होती. ज्यानंतर सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले होते. (Amitabh Bachchan) या बातम्यांनी इतका जोर धरला होता की, चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी स्वतः आपल्याला काहीही झालं नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे चाहत्यांची देखील चिंता मिटली आहे.