मुंबई प्रतिनिधी । ”कोणत्याही प्रकारचा अनादर व्यक्त करण्याचा हेतू नव्हता… यात भावना दुखावल्या गेल्या असल्यास दिलगीरी व्यक्त करतो…” असे ट्विट करत अमिताभ यांनी याबाबत माफी मागितली. काल या प्रकरणावर चहू बाजूने टीका होत असतांना अमिताभ यांनी बिनशर्त माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
त्यामुळे राज्यभरातून यावर प्रचंड टीका झाली होती .
का झाली होती टीका…?
ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य व औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात घालवले, अशा महान राजाचा उल्लेख एकेरी व ज्याने जुलूम व अत्याचार करत जनतेला वेठीस धरले त्याचा उल्लेख ”मुघल सम्राट” करण्यात आल्यामुळे या शो वर सध्या प्रचंड टीका होत आहे.
No disrespect meant at all .. apologies if it has hurt sentiments .. ???? https://t.co/ynPav4DYfO
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 8, 2019