नवी दिल्ली । अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 31 कोटींमध्ये मुंबईत डुप्लेक्स विकत घेतला आहे. त्याचा आकार 5184 चौरस फुट आहे. Zapkey.com ला सापडलेल्या कागदपत्रांनुसार, अमिताभ बच्चन यांनी क्रिस्टल ग्रुपच्या अटलांटिस प्रोजेक्ट मध्ये हा डुप्लेक्स विकत घेतला. क्रिस्टल ग्रुप टीयर-2 लेव्हलचा बिल्डर आहे.
मुद्रांक शुल्कात कपात केल्याचा मिळाला फायदा
बिग बीने डिसेंबर 2020 मध्ये ही मालमत्ता विकत घेतली होती, परंतु एप्रिल 2021 मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे. त्यांनी त्यावर 62 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. जर 2 टक्के मुद्रांक शुल्क 62 लाख रुपये असेल तर त्यानुसार मालमत्तेची किंमत 31 कोटी रुपये आहे. कोरोनायरस संसर्गामुळे महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात सूट दिली, ज्याचा फायदा अमिताभ बच्चन यांना देखील झाला आहे.
या घरात काय खास आहे ते जाणून घ्या
या डुप्लेक्ससह एक-दोन नव्हे तर 6 कार पार्किंग मिळाले आहे. या 28 मजली इमारतीत हा ड्युप्लेक्स फ्लॅट 27 व्या मजल्यावर आहे. यासंदर्भात अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयाला पाठवलेल्या ईमेलचे उत्तर अद्याप आलेले नाही. Zapkey.com चे सह-संस्थापक संदीप रेड्डी म्हणाले, “साथीच्या काळात लक्झरी अपार्टमेंटची विक्री वाढली आहे. यावेळी अनेक सेलेब्रिटीज, व्यावसायिक आणि प्रोफेशनल्सनी फ्लॅट घेतले. ”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group