हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या चित्रपटामुळे अन अॅक्टींगमुळे लाखोजणांची मन जिंकून घेतली आहेत. मागच्या काही महिन्यांपूर्वी ते एका ट्विटमुळे जोरदार चर्चेत आले होते , त्यात ते असं बोलले होते कि , “आता जाण्याची वेळ आली आहे” . त्यावेळी त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांचा प्रश्नांचा वर्षाव पडला होता. अन आता पुन्हा एकदा या बिग बींने एक ट्विट केले असून , यामध्ये त्यांनी आपल्या उत्तराधिकारीबद्दल काही असं लिहले आहे , ज्यामुळे चाहते गोंधळून गेलेत. तर चला या चर्चेत असणाऱ्या ट्विटबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अमिताभ बच्चन यांची ट्विट –
अमिताभ बच्चन सोशल मीडियावरती नेहमीच ऍक्टिव्ह मोडमध्ये असतात. पण आता अमिताभ बच्चन यांचे नवीन ट्विट चाहत्यांना अन कुटुंबाला गोंधळात टाकणार आहे. यामध्ये ते म्हणतायत कि , “माझा मुलगा, मुलगा असल्याने, माझा उत्तराधिकारी होणार नाही, जे माझे उत्तराधिकारी असतील ते माझे पुत्र होतील. पूज्यनिय बाबूजींचे शब्द आणि अभिषेक ते निभावत आहे”. (मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे”) असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहले आहे.
T 5323 – मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे 🙏🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 19, 2025
पूज्य बाबूजी के शब्द 🙏🙏
और ABHISHEK उसे निभा रहे हैं
👇🏽 नीचे भी पढ़िए, एक नयी शुरुआत
चाहत्यांचा गोंधळ वाढला –
काही महिन्यांपूर्वी केलेलं ट्विट अन आता केलेल्या ट्विटमुळे चाहते अजूनच गोंधळात पडले आहेत आणि त्यांना अमिताभ बच्चन यांचे शब्द नीट समजून घेणे कठीण झाले आहे. काही चाहत्यांनी या पोस्टवर रिप्लाय दिला आहे. या ट्विटवर काहींनी त्यांना विचारले आहे कि , “अमिताभ सर, तुम्हाला काय म्हणायचे आहे?” एका वापरकर्त्याने ट्विट केले, “तुम्ही आणि तुमचे विचार अजूनही त्याच युगाचे आहेत ज्या युगाचे तुम्ही आहात.” या प्रतिक्रियांच्या माध्यमातून अमिताभ यांच्या ट्विटमुळे निर्माण झालेला गोंधळ आणखी वाढला आहे.