हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amla Juice Benefits) आपल्या आहारात आपण काय खातोय याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आहार कायम सकस आणि पूर्ण असावा असे तज्ञ सांगतात. इतकेच नव्हे तर आपल्या आहारात आवश्यक त्या सत्त्वांचा समावेश असेल तर विविध आजारांची चिंता करायची गरज भासत नाही. म्हणूनच निरोगी आरोग्य देणाऱ्या काही पदार्थांचा आहारात समावेश करताना त्यामध्ये आवळा विसरू नका. कारण आवळा हा अत्यंत पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. चवीला किंचित आंबट आणि तुरट असा हा आवळा आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर लाभ देतो.
आवळ्याला त्याच्या महत्वपूर्ण गुणधर्मांमुळे आयुर्वेदातही स्थान आहे. (Amla Juice Benefits) अनेक पारंपारिक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. आजपर्यंत तुम्ही आवळ्याचा मुरांबा, लोणचे किंवा चटणी असे पदार्थ खाल्ले असतील. यामुळे नक्कीच तुम्हाला आरोग्यदायी लाभ देखील मिळाले असतील. मात्र, अधिक फायद्यांसाठी आवळ्याचा रस दररोज रिकामी पोटी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात. आज आपण आवळ्याच्या रसाने सेवन केल्याने काय फायदे मिळतात? याविषयी जाणून घेणार आहोत.
1. डिटॉक्सिफिकेशन
आपल्या शरीरातील अशुद्धता काढून टाकण्यासाठी आवळ्यातील डिटॉक्सिफाईंग गुणधर्म प्रभावीपणे मदत करतात. ज्यामुळे शरीराला हानी पोहचवणारे अनावश्यक आणि हानिकारक घटक शरीराबाहेर उत्सर्जित होतात. परिणामी रोग प्रतिकारक शक्ती वाढते. गंभीर आजरांचा धोका टाळतो आणि आपले आरोग्य वाढते.
2. सुलभ पचनक्रिया (Amla Juice Benefits)
आवळ्यातील पाचक गुणधर्म आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन होते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाचे आरोग्य सुधारते आणि इतर समस्या देखील दूर होतात.
3. सुरळीत चयापचय प्रक्रिया
आवळ्यामध्ये शरीरातील कॅलरी बर्न करणारे प्रभावी घटक असतात. त्यामुळॆ आपली चयापचय गती वाढते. याचा मुख्य फायदा म्हणजे पोटाच्या समस्या दूर राहतात आणि वजनसुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते. (Amla Juice Benefits)
4. निरोगी यकृत
आवळ्यातील हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आपल्या यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने यकृत स्वच्छ होते. परिणामी यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
5. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असेल तर मोठ्या गंभीर आजरांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, आवळ्याचा रस नियमित रिकाम्या पोटी घेणे फायदेशीर ठरते. (Amla Juice Benefits) यामुळे कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत करते आणि यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.
6. निरोगी केस
आपले केस लांबसडक आणि निरोगी असावे म्हणून आपण किती काही करतो. पण परिणाम फार क्वचित मिळतो. अशावेळी जर तुम्ही नियमितपणे रिकाम्यापोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केलात तर केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होईल. इतकेच नाही तर केसांची छिद्रे मजबूत होऊन केसगळती थांबेल. शिवाय केस चमकदारदेखील होतील.
7. त्वचेसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. (Amla Juice Benefits) यातील मजबूत अँटिऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्स कमी करून कोलेजनच्या संश्लेषणास प्रोत्साहन देते. ज्यामुळे त्वचा लवचिक होते. शिवाय अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात आणि त्वचा तजेलदार होते.