हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. परंतु अजित लवकरच बरे होतील आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार त्यांच्या घरी विलगीकरणात होते. नियमित तपासणीसाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरुन जावू नये. लवकरच ते बरे होतील आणि महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू आहेत. ते सध्या आराम करत असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. कोरोनातून लवकर बरे होऊन अजित पवार जनता दरबार घेतील. असंही त्यांनी म्हटले.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
दरम्यान, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’