Amravati Crime : महाप्रसादाला नेतो सांगत थेट शेतात नेलं अन….; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Amravati Crime Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amravati Crime : महाप्रसादाला नेतो असं सांगून एका 23 वर्षीय तरुणीला शेतातील झोपडीत नेऊन रात्रभर सामूहिक अत्याचार (Rape) करण्यात आल्याची घृणास्पद घटना अमरावतीमध्ये घडली आहे. एवढच नव्हे तर जबरदस्तीला विरोध करताच या नराधमांनी सदर पीडित तरुणीला मारहाण सुद्धा केली. या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ओळखीच्याच व्यक्तीने केला घात – Amravati Crime

महेश वाघमारे (वय 25), पिंटू हरले (वय 39), रमेश भलावी (वय 40), इस्माईल खाँ (वय 65), नितीन ठाकरे (वय 25) अशी सदर आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपींपैकी महेश वाघमारे हा पीडितेच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. त्यानेच पीडित तरूणीला महा प्रसादकरिता मालखेड येथे नेतो असे सांगितलं. रात्रभर त्याने तिला त्याच्याच घरात ठेवले, त्यानंतर 28 जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळगावी सोडायला निघाला. मात्र, गावी न जाता त्याने गाडी थेट शेताच्या दिशेने वळवली. शेतात असलेल्या एका खोलीत त्याने पीडितेला नेल. त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार पिंटू हरले हा सुद्धा त्याठिकाणी गेला आणि दोघांनी मिळून तरुणीवर अत्याचार केला.

हे दोघे एव्हड्यावरच थांबले नाहीत, त्यानंतर त्याठिकाणी इस्माईल खाँ, रमेश भलावी,आणि नितीन ठाकरे हे देखील आले आणि त्यांनीही तिच्यावर जबरदस्ती केली. पीडित तरुणीने विरोध केला असता तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारू अशी धमकी सुद्धा देण्यात आली. या घटनेनंतर पीडित तरुणीने कसेबसे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला.

तरुणीच्या कुटुंबीयांनी तात्काळ शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल (Amravati Crime) पोलीस तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आणि अगदी कमी वेळेतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. मात्र, या खळबळजनक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.