मोर्शीमधील दमयंती नदीजवळ सापडले नवजात अर्भक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावतीतील मोर्शी शहरातील दमयंती नदीच्या काठावर नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दमयंती नदीच्या काठावर असलेल्या कैलास टॉकीजच्या जवळच कोणीतरी अज्ञाताने हे नवजात अर्भक टाकल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दमयंतीनदीच्या काठाजवळ हे नवजात अर्भक टाकले आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यातील काही नागरिकांनी या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या अर्भकाचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आहे.

अज्ञात व्यक्तींनी पहाटेच्यावेळी कोणी या अर्भकाला या निर्जन ठिकाणी आणून टाकले असावे याचा शोध पोलीस घेत आहेत. या अर्भकाबाबत परिसरातील नागरिक अनेक तर्क वितर्क लावत आहेत. मोर्शी पोलिसांनी संबंधीत अर्भक ताब्यात घेत मृतदेह रुग्णालयात पाठवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.