कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील
रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेल्या कराड तालुक्यातील काले या गावातील महात्मा गांधी विद्यालयाला 1 ऑगस्ट रोजी 74 वर्ष पूर्ण झाली असून 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमृत महोत्सव वर्षाचा प्रारंभ उत्साहात पार पडला.
स्व.शांताराम काकडे (सर) व स्व.इस्माईल मुल्ला (साहेब) यांनी 1 ऑगस्ट 1948 साली रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय,काले ची स्थापना स्व.बळवंत गणपती देसाई (बाळू पैलवान) यांच्या वाड्यामध्ये मा.आर.एम.कोळी (सर) या पहिल्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन केली. आज विद्यालय 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. याच अमृत महोत्सवाचा शुभारंभ रयत शिक्षण संस्थेचे जन्मस्थळ महात्मा गांधी वसतिगृह,काले येथे सन 1948 सालचे पहिले विद्यार्थी रयत चे माजी प्राचार्य मा.आर.एम.कोळी (सर) यांच्या शुभ हस्ते रयत ज्योत प्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी गावातील प्रमुख चौकातील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी रयत ज्योत विद्यालयात आणली त्यानंतर डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील, विद्येची देवता सरस्वती, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण जेष्ठ इतिहासकार, शिवव्याख्याते व विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी श्रीमती.सुनंदा रामराव शिंदे- देसाई यांचे बंधू मा.के.एन.देसाई (सर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर नूतन इमारतीच्या विद्यार्थी प्रवेशाचा शुभारंभ विकास पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला
रयत ज्योत प्रज्वलन, अमृत महोत्सव लोगोचे अनावर व नूतन इमारतीमध्ये विद्यार्थी प्रवेशाच्या शुभारंभ या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा.दयानंद पाटील (भाऊ), मा.संजय देसाई , विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस.एन. नलवडे(सर), पर्यवेक्षक मा.राजेंद्र नांगरे (सर)व सर्व शिक्षक , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष.सचिन पाटील माता पालक संघाचे उपाध्यक्ष. मानसिंग पाटील माता पालक संघाचे सदस्य, तसेच मा.सौरभ कुलकर्णी, मा.संजय पाटील, मा. बाळकृष्ण पाटील(अण्णा), मा.श्रीकांत पाटील (सर), मा.राजेंद्र पाटील (नाना), पत्रकार मा.जितेंद्र पाटील (भाऊ), काले ग्रा.पं सदस्य मा.प्रकाश पाटील, शिंगवादक मा.मच्छिंद्र गुरव (नाना), KMS सहेली ग्रुप कराडच्या अध्यक्षा व माजी विद्यार्थी मा.शितल जगताप (मॅडम), प्रिन्सिपल सौ.विद्या मोरे (मॅडम) ,मा.राधिका देसाई(मॅडम) माजी विद्यार्थी, पालक व काले ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर विद्यालयामार्फत गावातील प्रमुख रस्त्यांवरती प्रभात फेरी काढण्यात आली लक्ष्मी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विद्यालयाच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. चौकामध्ये विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शाळेचे हितचिंतक मा.विकास देसाई(साहेब), मा. गणेश मुखवटे व मा.शेरखान शेख (भैय्या) यांनी सर्व विद्यार्थ्यांना राजीगरा लाडू चे वाटप केले.
ज्या ठिकाणी विद्यालयाची स्थापना झाली ते स्व.बळवंत गणपती देसाई (बाळू पैलवान) यांच्या वाड्याकडे रयत ज्योत चे प्रस्थान करून पहिले विद्यार्थी मा.आर.एम. कोळी (सर), विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस.एन.नलवडे (सर) व मा.के.एन.देसाई यांच्या शुभहस्ते स्व.बळवंत गणपती देसाई (बाळू पैलवान) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मा.डॉ.अजित देसाई , मा.विकास देसाई, मा.प्रितम देसाई व देसाई परिवारातील सदस्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी काले गाव दणाणून निघाले होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरती रयत ज्योतीचे पूजन मा.मानसिंग पाटील व मा. विकास पाटील यांच्या परिवाराने केले. गावातील प्रमुख चौकांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नयनरम्य असे झांज पथकाचे विविध प्रकार सादर केले. दरम्यान, विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उर्वरित कामासाठी अजूनही विद्यालयाच्या 40 लाखांची गरज असून इच्छुकानी मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी विकास पाटील यांनी केले आहे.