हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amrita Ahuja : गुरुवारी (23 मार्च) हिंडेनबर्गने ट्विटरचे माजी सीईओ असलेल्या जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखालील मोबाइल पेमेंट कंपनी ब्लॉक इंक विरोधात एक रिपोर्ट रिलीज केला. ज्यामध्ये, ब्लॉक इंकने फसवणूक करून आपल्या युझर्सची संख्या वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने नवीन ग्राहक जोडण्याच्या खर्चातही लक्षणीय कपात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंडनबर्गच्या या रिपोर्टमध्ये जॅक डोर्सी व्यतिरिक्त Amrita Ahuja चे नावही अनेकदा घेण्यात आले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनुसार, ब्लॉक इंकच्या सीएफओ असलेल्या अमृता आहुजा यांनी कथितरित्या लाखो डॉलर्सचा स्टॉक डंप केला. चला तर मग अमृता आहुजा कोण आहेत आणि तिचा भारताशी काय संबंध आहे ते जाणून घेउयात…
याबाबत टिप्पणी करताना हिंडेनबर्ग म्हणाले कि, “जवळपास 2 वर्षांच्या तपासणीनंतर आम्हाला आढळले आहे की, ब्लॉक इंक.ने मदत करण्याचा दावा केलेल्या डेमोग्राफिक्सचा पद्धतशीरपणे फायदा घेतला आहे.” हिंडेनबर्ग कडून कंपनीवर गुंतवणूकदारांची दिशाभूल, फसवणूक, सरकारची फसवणूक आणि हेराफेरी सहीत अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.
Amrita Ahuja कोण आहेत ???
वॉल स्ट्रीट जर्नलमधील माहितीनुसार, Amrita Ahuja यांचे पालक भारतीय स्थलांतरित आहेत. जे क्लीव्हलँड उपनगरात डेकेअर सेंटर चालवतात. 2000 मध्ये अमृताने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. 2005 ते 2007 पर्यंत त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली. अमृता आहुजाच्या लिंक्डइनवरील प्रोफाइल नुसार, त्या गेल्या 4 वर्षांपासून 3 महिन्यांपासून ब्लॉक इंकमध्ये काम करत आहेत.
यापूर्वी त्यांनी Disney, Airbnb, McKinsey & Company यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. फॉक्समध्ये काम करत असताना, Amrita Ahuja यांनी जगभरात लोकप्रिय झालेले मोबाइल गेम कॉल ऑफ ड्यूटी आणि कँडी क्रश यांसारख्या अनेक गेमच्या डेव्हलपमेंट आणि मार्केटिंगवरही काम केले आहे. स्क्वेअरमध्ये काम करत असताना, अमृता आहुजा यांच्या कार्यकाळात कंपनीने लहान व्यावसायिकांच्या ग्राहकांसाठी ऑनलाइन स्टोअरफ्रंट तयार करण्यात मदत केली. जेणेकरून कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात पायी वाहतुकीत झालेली घट भरून काढता येईल. फॉर्च्युनच्या 2022 च्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या लिस्टमध्ये अमृता आहुजाचे नाव देखील सामील आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.linkedin.com/in/amrita-ahuja-2402595
हे पण वाचा :
येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस
Xiaomi चे स्मार्टफोन इतके स्वस्त कसे काय ??? कंपनी अशा प्रकारे वसूल करते आपला खर्च
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.25% व्याज
Jio कडून ग्राहकांना धक्का, ‘हा’ रिचार्ज प्लॅन 100 रुपयांनी महागला
Bank Account बंद करताय जरा थांबा… लक्षात घ्या ‘या’ 5 गोष्टी !!!