अमूल दूध महागले; प्रति लीटर 3 रुपयांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. कारण अमूल कंपनीने आजपासून आपल्या दूध दरात वाढ केलेली आहे. दूध दरवाढीनुसार आता अमूलचे ताजे अर्धा लिटर दूध 27 रुपयांनी मिळणार असून एक लिटरचं पिशीवी 54 रुपयाला मिळणार आहे. अमूल गोल्ड म्हणजे फूल क्रीम दूधाची अर्धा लिटरची पिशवी 33 रुपयांना मिळणार आहे. तर एक लिटरची पिशवी 66 रुपयांना मिळणार आहे.

अमूलचे देशभरात ३१ प्लांट आहेत. त्यापैकी १३ फक्त गुजरातमध्ये आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआरमध्ये ४, उत्तर प्रदेशात २, महाराष्ट्रात ४, राजस्थानमध्ये ३ प्लांट आहेत. याशिवाय छत्तीसगड, आसाम, मध्य प्रदेश, झारखंड आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी एक प्लांट आहे.

यापूर्वी अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा अमूलने आपल्या दुधात दरवाढ केलेली आहे.

अमूल उत्पादन लिटर दरवाढ रुपयांमध्ये

1) अमूल ताझा 500 मिली – 27
2) अमूल ताझा 1 लीटर – 54
3) अमूल ताझा 2 लीटर – 108
4) अमूल ताझा 6 लिटर – 524
5) अमूल ताझा 180 मिली – 10
6) अमूल गोल्ड 500 मिली – 33
7) अमूल गोल्ड 1 लीटर – 66
8) अमूल गोल्ड 6 लीटर – 396
9) अमूल गायीचे दूध 500 मिली – 28
10) अमूल गायीचे दूध 1 लीटर – 56
11) अमूल A2 म्हशीचे दूध 500 मिली – 35
12) अमूल A2 म्हशीचे दूध 1 लीटर – 70
13) अमूल A2 म्हशीचे दूध 6 लिटर – 420

दुग्धजन्य पदार्थांचे दरही वाढणार?

दुधाचे दर वाढल्याने इतर दुग्धजन्य पदार्थांचे दरही वाढणार हे नक्की. आता दूध महाग झाल्याने तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम, ताक याबरोबरच चहा, कॉफी, मिठाई, चॉकलेटचे भावही वाढण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत दुधाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या बजेटला आणखी एक झटका बसला आहे.