दावोसमध्ये राज्याच्या हितासाठी झाले महत्वपूर्ण ‘महाकरार’! महाराष्ट्रात 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Davos
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने राज्याच्या हितासाठी 3 लाख 10 हजार 850 कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच, गुरुवारी महाराष्ट्र सरकार 42 हजार 825 कोटींचे करार करणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याबरोबर एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी विश्वास दाखवल्याने याचा देखील मोठा फायदा झाला आहे. दावोसमध्ये झालेल्या या करारामुळे महाराष्ट्रात तब्बल 2 लाख नोकऱ्या तरुणांसाठी निर्माण होणार आहेत.

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये परिषदेच्या पहिल्याच दिवशी 6 उद्योगांबरोबर 1 लाख 2 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. यामुळे 26 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी सरकारने 8 उद्योजकांची 2 लाख 8 हजार 850 कोटींचे गुंतवणूक केले आहेत. यातून 1 लाख 51 हजार 900 रोजगार तरुणांसाठी उपलब्ध होणार आहे. गुरुवारी आणखीन 6 उद्योजकांशी 42 हजार 825 कोटींचे करार कऱण्यात येणार आहे. यातून 13 हजार रोजगार निर्माण होतील अशी आशा आहे.

गुंतवणुकीचे करार आणि रोजगार निर्मिती

16 जानेवारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिषदेच्या पहिल्याच दिवशी आयनॉक्स एअर प्रोडक्ट 25 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. ज्यातून 5 हजार रोजगार निर्मिती होईल. तसेच, बी सी जिंदालसोबत 41 हजार कोटींचा करार केल्याने 5 हजार रोजगार निर्माण होणार आहे. तसेच, जेएसडब्ल्यू स्टील 25 हजार कोटींच्या करारामुळे 15 हजार रोजगार निर्माण होणार आहे. एबी इन बेव्हसोबत 600 कोटी करार झाल्याने 150 रोजगार निर्माण होतील. गोदरेज एग्रोव्हेटसोबत 1000 कोटी करार केल्याने
650 रोजगार रोजगार निर्माण होणारे. अमेरिका स्थित डेटा कंपनीशी 10 हजार कोटींचा करार केल्याने 200 रोजगार निर्माण होणारे.

17 जानेवारी – परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अदानी ग्रुपबरोबर 50 हजार कोटींचा करार केल्याने 500रोजगार निर्माण होतील. इंडियन ज्वेलरी पार्कशी 50 हजार कोटिंचा करार झाल्याने 1 लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच वेब वर्क्स 5 हजार कोटींचा करार झाल्याने 100 रोजगार निर्माण होणारे. विविध कंपन्यांशी 35 कोटींचा करार केल्याने 15 हजार रोजगार निर्माण होणारे.

18 जानेवारी – गुरुवारी अनेक महत्त्वाचे करार पार पडणार आहेत. या करारामध्ये सुरजागड इस्पातबरोबर, दहा हजार कोटींचा करार होईल. कालिका स्टीलसोबत 900 कोटींचा करार होईल. मिलियन स्टीलसोबत 250 कोटींचा करार होईल. असे अनेक विविध करार राज्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे करतील.