Bawdhsn Yatra : बावधनच्या बगाड यात्रेत बैलाचा धुडगूस; मोकळ्या सुटलेला बैल गर्दीत घुसला अन् नंतर..(Video)

bagad yatra Bavadhan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची बगाड यात्रा काल उत्साहात पार पडली. या बगाड यात्रेवेळी बगाड्याला गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने ओढण्यात येते. यावेळी बगाडाच्या बैल जोडीतून एक बैल सुटून भाविक भक्तांमध्ये अचानक शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे यात्रा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन बागड यात्रेत बगाडाला खीलारी बैलांच्या जोड्या झुंपल्या जातात. काल खिलारी बैल जोडींद्वारे बगाड ओढत असताना एका बैलजोडीतील एक बैल सुटला. यावेळी बगाडासभाववताली मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. बैल सुटल्याने तो अचानक भाविकांच्या घोळक्यात शिरला. त्यामुळे भाविकांच्यात एकच गोंधळ उडून गेला.

अचानकपणे सुटलेल्या बैलाला पकडण्यासाठी भाविकांनीही कसोसीने प्रयत्न केले. मात्र, बैल भाविकांच्या घोळक्यात शिरल्याने त्याने अनेक भाविकांना जखमी केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये बगाडाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांमध्ये बैल सुटल्याने एकच गोंधळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.