वर्दळीच्या बीड बायपास परिसरात वृद्धाचा दगडाने ठेचून खून

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या बीड बायपास परिसरातील सहारा सिटीच्या समोरील भागात एका वृद्धाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली. बबन शिंदे (65, रा. निपाणी भालगाव) असे मृताचे नाव असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरातील सारा सिटी समोर एक वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे एका सुरक्षारक्षकाने पाहिले. त्याच्या अंगावर मोठ्या जखमा असल्यामुळे त्याने घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. पोलिसांना मृताच्या खिशामध्ये आधार कार्ड सापडले त्यानुसार ओळख पटली. हा प्रकार खूनाचा असल्यामुळे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आला. ही घटना 20 तासांपूर्वीची असून दुसर्‍या एखाद्या जागी मारहाण करून मृतदेह ज्या ठिकाणी टाकलेला असू शकतो अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी मृताचा मुलगा सुदाम शिंदे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत. घटनास्थळी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी पाहणी केली.