साताऱ्यात शिवशाही बसखाली सापडून वृध्द महिला ठार

0
144
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळ सात वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध फिरस्त महिला जागीच ठार झाली आहे. गौडाबाई काळे (वय- 75) असे संबंधित महिलेचे नाव आहे. सकाळी बसस्थानकात झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा बसस्थानकात आज शुक्रवारी 3 जून रोजी सकाळी सात वाजता ही घटना घडली. मुंबईला जाणाऱ्या फलाटवरती शिवसाही बस क्रमांक (MH-06-BW- 0642) या गाडी सोबत हा अपघात झाला.

या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. यावेळी संबंधित महिलेचा मृत्यू कोणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here