‘एकदा नव्हे तर लाखवेळा गद्दार म्हणेन, हिम्मत असेल तर…’; शिवसेनेच्या रणरागिणीचं संतोष बांगरांना खुलं आव्हान

Santosh Bangar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे बंडखोर नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा असे आवाहन त्याने कार्यकर्त्यांशी बोलताना दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेतील एका रणरागीणीने त्यांच्या या चॅलेंजला प्रत्युत्तर दिले आहे. या रणरागीणीनीचे नाव अयोध्या पोळ आहे.

अयोध्या पोळ काय म्हणाल्या?
शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि मातोश्रीसोबत आहे. ज्या ज्या लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. त्यामुळे मी एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणणार. संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यात हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली त्यांनी मारावी. त्यांच्या समर्थकांना मला फोन करायला सांगण्यापेक्षा, मला फोन करुन त्यांनी धमकी द्यावी, असं खुलं आव्हान शिवसेनेची रणरागिणी अयोध्या पोळ यांनी दिलं आहे.

संतोष बांगर काय म्हणाले ?
कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी तीव्र शब्दांचा वापर केला होता. आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहोत. पण आपल्याला का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं संतोष बांगर (Santosh Bangar) संतापून म्हणाले होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर