सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील सदर बझार परिसरातील कॅनॉलमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह वाहून आला असून संबंधित मृत व्यक्तीच्या गळ्याभोवती जखम आढळून आली आहे. त्यामुळे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील सदर बझारमध्ये एक कॅनॉल आहे. या कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे या ठिकाणी कपडे धुण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील महिला येत आहेत. तर अंघोळ करण्यासाठी पुरुषही येत आहेत.
रविवारी नेहमीप्रमाणे काही पुरुष या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आले असता. त्यांना कॅनॉलमधून एक पुरुष जातीचा अंदाजे 40 ते 45 वय असलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह वाहून येत असताना दिसून आला. त्यांनी तत्काळ त्या मृतदेहाला कॅनॉलमधून बाहेर काढले. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याची काम केले जात आहे.