पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हात काँग्रेसला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आनंदराव पाटील यांनी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जातंय.

माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता आमदार आनंदराव पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. पाटील यांनी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. पाटील लवकरच आमदार पदाचा राजीनामा देऊन भाजपात जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र यावर अद्याप पाटील यांच्याकडून काहीही माहिती मिळालेली नाही.

आनंदराव पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पाटील यांच्या भाजप प्रवेशाने पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धोका पोहोचू शकतो. तसेच माजी काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का बसणार आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link Click here to Join Group
WhatsApp Nambar 9890324729
Facebook Page Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

हे पण वाचा –

पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘जावयाला’ उमेदवारी जाहीर

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले

राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

कर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता

Leave a Comment