अवघ्या काही सेकंदात नागपूरमधील हनुमानाचे पुरातन मंदिर कोसळले, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ancient temple of hanuman collapsed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या ठिकठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत दरडी, जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारची एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरमध्ये एक हनुमान मंदिर जमीनदोस्त झाले (ancient temple of hanuman collapsed) आहे. जुने झालेले हे मंदिर अवघ्या काही सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नागपूरमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने नागपूरच्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. मागच्या आठ दिवसापासून सतत होणाऱ्या पावसामुळे नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळले(ancient temple of hanuman collapsed). शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हि दुर्घटना घडली आहे. लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर (ancient temple of hanuman collapsed) पावसामुळे जिर्ण झाले होते. या मंदिराच्या भिंती भुसभुशीत झाल्या होत्या. त्यामुळे मंदिराची (ancient temple of hanuman collapsed) इमारत कधीही कोसळले अशी भीती होती. त्यामुळे या मंदिरात कुणीही नव्हते. यामुळे या दुर्घटनेत कोणतीहि जीवितहानी झाली नाही.

शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मंदिर (ancient temple of hanuman collapsed) एका बाजूला झुकले. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी तिथे जमा झाली होती. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हे मंदिर जमीनदोस्त झाले. हे मंदिर जमीनदोस्त (ancient temple of hanuman collapsed) झाल्यानंतर उपस्थितीत लोकांनी जय हनुमान अशा घोषणा देत हनुमानाला नमस्कार घातला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर