अन् केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना रडू कोसळले

नाशिक | पालघरमधून सुरु झालेल्या डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा धुळ्यात समारोप झाला. त्यानंतर शनिवारी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट येथे सासरे आणि माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले. सासऱ्यांना अभिवादन करुन श्रद्धांजली वाहताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. सासूबाई गळ्यात पडताच त्यांनाही रडू कोसळले. यावेळी उपस्थित नातेवाई आणि कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते.

भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ए. टी. पवार यांच्या सून आहेत. 2019 साली निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपाचे कमळ हाती घेतले. भारती पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ग्रामीण भागात अनेक वर्षे काम केले आहे. त्या सुरुवातीपासूनच अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून भारती पवार यांनी कुपोषणाच्या समस्येवर काम केले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला चांगलेच धारेवर धरले होते. अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर भारती पवार यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

शनिवारी दि.21 रोजी सासरे ए. टी. पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करुन श्रद्धांजली वाहताना डॉ. भारती पवार भावनिक झालेल्या होत्या. यावेळी सासूबाई गळ्यात पडताच त्यांनाही रडू कोसळले. सासऱ्यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहताना सासूबाईंनी मिठी मारताच भारती पवारांना रडू कोसळले.

You might also like