‘या’ राज्याने ऑनलाइन गेम Rummy आणि Poker वर घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । ऑनलाइन गेम्स रमी आणि पोकरवर बंदी घालण्याचा निर्णय आंध्रप्रदेश सरकारने घेतला आहे. या गेम्सच्या माध्यमातून तरुण चुकीच्या मार्गावर भरकटत असल्याने आंध्रप्रदेश सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ऑनलाइन जुगारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असं माहिती मंत्री वैकटरमय्या यांनी दिली आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वैकटरमय्या यांनी सांगितलं की, “ऑनलाइन जुगाराने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. दिशाभूल करुन तरुणांचं नुकसान केलं जात होतं. यामुळेच आम्ही तरुणांचं रक्षण करण्याच्या हेतूने अशा पद्धतीच्या सर्व ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला”.

मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार, नियमांचं उल्लंघन केल्यास बंदी घातलेल्या ऑनलाइन गेम्सच्या आयोजकांना एक वर्षांचा तुरुंगवास तसंच दंड ठोठावला जाऊ शकतो. दुसऱ्या वेळी गुन्हा केल्यास ही शिक्षा दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड अशी आहे. याशिवाय गेम्स खेळणाऱ्यांनाही सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.