माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्स यांच्या कार्ला अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ४६ वर्षीय सायमंड्सचा क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अँड्र्यू सायमंड्स याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंज येथून निघाला असताना हि घटना घडली.

अपघातानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनीही सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सायमंड्सच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.