Friday, June 2, 2023

Sofia Ansari चं Instagram अकाउंट अचानक का बंद करण्यात आलं? Adult कंटेन्टमुळे होती चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोफिया अन्सारीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. सोफिया अन्सारीचे अकाऊंट इन्स्टाग्रामनेच काढून टाकले आहे. त्यामुळे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्राम अकाउंट आता कोणीही पाहू शकणार नाही. सोफियाचे अॅडल्ट व्हिडिओ मेकिंग करण्यामुळेच इंस्टाग्रामने अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

कोण आहे सोफिया अन्सारी?

सोफिया अन्सारी एक अतिशय लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि टिकटोकर म्हणून ओळखली जाते. सोफिया अन्सारी तिच्या छोट्या व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध आहे. भारत सरकारने 2020 मध्ये टिकटॉक बंद केल्यानंतर सोपिया इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सक्रिय झाली. तेव्हापासून, सोफिया अधिकाधिक लोकप्रिय झाली. मात्र तिची बोल्ड फोटो अनेकदा वादाचे विषय होत होते.

सोफिया अन्सारीचे इंस्टाग्रामवर सुमारे 98 लाख फॉलोअर्स होते आणि तिचे 10 मिलियनच्या जवळपास होते. त्याच वेळी, तिच्या YouTube चे 188K पेक्षा जास्त सदस्य आहेत. सोफिया प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे हॉट व्हिडिओ शेअर करून लोकप्रियता मिळवते. ती लहान रील्सचे व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करायची आणि यासोबतच तिच्या यूट्यूबवर शॉर्ट्स आणि व्लॉग व्हिडिओही लोकप्रिय आहेत.